पिंपरी (प्रतिनिधी) – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीनही मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसू शकते. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीतून तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नाना काटे यांनी चिंचवडमधून माघार घेतली आहे. दुसरीकडे भोसरी मतदारसंघातून रवी लांडगे यांनी माघार घेतल्याने येथेही थेट लढत होणार आहे.
शहरातील तीनही मतदारसंघामध्ये यंदा मोठ्या संख्येने मातब्बर नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांचे गणित बिघडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. परंतु अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीनही मतदारसंघातील ००० इतक्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. यात पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून ०० चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून ०० तर भोसरी मतदारसघातून ०० इतक्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार
या मतदारसंघातून महायुतीचे अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शिलवंत मुख्य उमेदवार आहेत. येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, स्वप्िनल कांबळे, राष्ट्रवादीचे काळूराम पवार, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्याने महायुतीत चिंतेचे वातावरण होते. यांनी आता माघार घेत महायुतीला दिलासा दिला आहे. तर महाविकास आघाडीतील शिवेसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे दिपक रोकडे, काॅंग्रेसचे मनोज कांबळे यांनी महाविकास आघाडीच्या वतुर्ळात चिंता निर्माण केली होती. यांनी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला दिलासा दिला आहे. या मतदारसंघातून तब्बल ०० इतक्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पिंपरी मतदारसंघासाठी एकूण 39 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तीन अर्ज बाद ठरले होते. तर २१ उमेदवारांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात
या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतच थेट लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांनी मनधरणी केल्याने रवी लांडगे यांनी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघात २४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी ६ अर्ज छानणीत बाद ठरले. ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
अनेक इच्छुक आणि नाराजांमुळे हा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. या मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी अर्ज दाखल केल्याने पोटनिवडणुकीप्रमाणे ही निवडणूक देखील तिरंगी होण्याची शक्यता होती. परंतु अखेरीस नाना काटे यांना मनविण्यात यश आले असून त्यांच्यासह ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. चिंचवड मतदारसंघासाठी एकूण 3२ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच अर्ज बाद ठरले होते. तर ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत.