पिंपरी-चिंचवड : कार अंगावर घालून वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

पाय अडकलेल्या पोलिसाला एक किलोमीटर बोनेटवर बसवून केला प्रवास

पिंपरी( प्रतिनिधी) – कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना पोलिसाचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला. याही स्थितीत माथेफिरू चालकाने गाडी पुढे पळवली. जीव वाचवण्यासाठी पोलीस कर्मचारी बोनेटवर बसला.

त्याच अवस्थेत सुसाट गाडी पळवत त्या पोलिसाला एक किलोमीटर पुढे नेले. रस्त्यावरील वाहनचालक व वाहतूक पोलीस त्या माथेफिरू कार चालकाला गाडी थांबविण्यास सांगत होते. त्या कारच्या पुढे असलेल्या एका चालकाने गाडी थांबविल्याने पोलिसाचा प्राण वाचला. 

मात्र फरफटत नेल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. आबा विजय सावंत असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे तर युवराज किसन हातवडे (रा. पिंपळे निलख) असे माथेफिरू वाहन चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ५) सायंकाळी चिंचवड येथे घडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.