पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका कमल घोलप यांची दोन दिवसांपूर्वी केलेली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यासह त्यांचे पती, नऊ वर्षांची पुतणी आणि घरकाम करणाऱ्या मावशी यांना देखील करोनाची लागण झाली आहे. या सर्व करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांना देखील याची लागण झाली आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे व भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर आमदार महेश लांडगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.