पिंपळे गुरव – झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतरही संरक्षक जाळ्या काढण्यात आल्या नव्हत्या. तसेच काही उपद्रवी नागरिकांनी या जाळ्यामध्ये कचरा टाकला. याबाबत दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच उद्यान विभागाने झाडांच्या संरक्षण जाळ्या काढून टाकल्या. त्यामुळे झाडांनी मोकळा श्वास घेतला.
नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील अनेक झाडांना रोपटे असताना संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या होत्या. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतरही या जाळ्या काढण्यात आल्या नाहीत. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा निवेदन देऊन उपोषणाची करणार असा इशारा पर्यावरण प्रेमी अण्णा जोगदंड यांनी उद्यान विभागाला दिला होता.
याबाबत दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेऊन बुधवारी (दि. 7) झाडांची जाळीच्या विळख्यातुन सुटका केली. एवढा तफ्तरतेने दखल घेतल्यामुळे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दै. प्रभात व सहायक उद्यान अधिक्षक रमेश वसावे यांचे आभार मानले.