पिंपरी : कमरेच्या बेल्टने विनाकारण मारहाण करून एकाचा खून करण्यात आला. ही घटना ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.
तानाजी आप्पाराव कमजले (वय 55, रा. मोरे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभिजीत गुंजाळ (नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रमेश रघुनाथ बगाटे (वय 48, सध्या रा. ट्रान्सपोर्ट नगर निगडी) यांनी सोमवारी (दि. 8) याबाबत मारहाण झाल्याची फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बगाटे व मयत तानाजी हे दिवाळी पाडव्याच्या दिवशी (दि. 5) ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी गुंजाळ याने काहीही कारण नसताना फिर्यादी बगाटे व मयत तानाजी यांना कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.