पिंपळे गुरव – नवी सांगवी येथील अनेक घंटागाड्यांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याची धुन लावली आहे. पण काही गाड्यावर गेल्या पाच महिन्यांपासून ती धून बंद झाली आहे. नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा या गाड्यांची धून एकून कचरा घराबाहेर आणण्याची सवय झाली आहे. मात्र, आता ती धून ऐकू येत नसल्याने कचऱ्याची ढीग घर आणि परिसरात साठत आहे.
पूर्वी घंटागाडी आली की, त्याला ओला व सुका करचा वर्गीकरणाची लावलेली धून ऐकू येत होती. त्यामुळे घंटागाडी आल्याचे समजत होते. आता ती बंद असल्याने नागरिकांना घंटागाडी आल्याचे समजत नाही. तसेच या वाहनांचा हॉर्न आणि इतर गाड्यांचा हॉर्न सारखाच वाजत असल्याने नागरिक कचरा घराबाहेर घेऊन येतात व घंटागाडी नसेल तर परत जातात. गेल्या पाच महिन्यांपासून नागरिकांची अशीच कसरत सुरू आहे.
या विषयी श्रीकांत जोगदंड म्हणाले की, गेल्या महिन्याभरापूर्वीच आयुक्तांनी स्वच्छता बाबतीत पालिकेचा 19 व्या क्रमांकावरून पहिला क्रमांक येण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवला आहे. विविध संघटना व नागरिकांना स्वच्छता चॅम्पियन म्हणून आयुक्तांनी सन्मानित केले आहे. पण पालिकेचे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते. ते ठेकेदार कंपनीवर एवढे मेहरबान का झालेत असा प्रश्न पडला आहे.
सांगवी परिसरात फिरणाऱ्या वाहनाची धून बंद आहे. गेल्या महिनाभरापासून आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांनाही वारंवार फोन करून कल्पना दिली. त्यांनी ए.जी. कंपनीचे मुख्य ठेकेदार मिलिंद उपाध्यक्ष यांना कळविले आहे, असे सांगितले. तर, ए. जी. कंपनीचे ठेकेदार सुपरवायझर दीपक पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही आठ दिवसांत धून सुरू करू असे सांगतात. परंतु, तसे होताना दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. तर, घंटागाडीबरोबर असणाऱ्या प्रोजेक्ट असिस्टंट आशा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही वरती तक्रार केली आहे.
दिलेलीच गाणी आम्ही लावतो. तसचे समोरून एखादे वाहन आले किंवा गर्दी असेल कतर, गाडीचा हॉर्न हा वाजवा लागतो. तसेच तीच धून वाजविण्याची अपेक्षा असेल तर, आम्ही ती पुन्हा लावतो.
– दीपक पाटोळे, ठेकेदार कंपनीचे सुपरवायझर
समतानगर गल्ली नंबर 1, 2, संततुकाराम नगर गल्ली नंबर 1, 2, महाराष्ट्र कॉलनी, भारत बेकरी रोड या भागामध्ये गाडी असते. मात्र, त्यांना वारंवार सांगून देखील धून लावली जात नाही. नागरिकांना कचरा गाडी आल्याचे समजावे यासाठी ती धून लावावी.
श्रीकांत जोगदंड, पदाधिकारी, वुमन्स सोशल डेव्हलेपमेंट.