आणखी 1113 करोना रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांनी 67 हजारांचा टप्पा पार केला आहे. तसेच एका दिवसामध्ये करोनामुळे 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा नवीन 1113 नवीन रुग्णांची भर शहरामध्ये पडली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 67596 इतकी झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 1113 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला नाही. तसेच 24 तासांमध्ये 33 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 18 व शहराबाहेरील 15 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 67596 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 7244 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 1113 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरूवारी दिवसभरात शहरात 33 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील भोसरी, पिंपरी, किवळे, आकुर्डी, निगडी, चिखली, रावेत, पुनावळे, थेरगाव, पिंपळे गुरव, भीमनगर, काळेवाडी, सांगवी येथील 18 रुग्णांचा मृत्यू झाला.
तर शहराबाहेरील वानवडी, गंगापूर, कर्वेनगर, जुन्नर, बावधन, हडपसर, कात्रज, लातूर, खेड, आंबेगाव, येरवडा येथील 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात 1199 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 57052 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5385 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. अद्याप 1815 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.