पिंपरी – आणखी 176 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू उपचारा दरम्यान झाला आहे.
रविवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 169 आणि शहराबाहेरील 7 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या 94437 इतकी झाली आहे.
तसेच गेल्या 24 तासांमध्ये 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची शहरातील नागरिकांची संख्या 91144 झाली आहे, तर शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 7205 जणांनी करोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये दोन रुग्णांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. एक पुरुष आणि एका स्त्रीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील व शहराबाहेरील अशा असे एकूण 2413 जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण पन्नाशीच्या आतील आहेत.
रविवारी एकूण 2705 संशयित चाचणीसाठी रुग्णालयात दाखल झाले. अद्याप 1130 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.