पिंपरी-चिंचवड : 135 करोनाबाधित; दोघांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 135 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 88 हजार 422 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 131 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 4 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे.

तर गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवाशी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1538 वर पोहोचला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.