पिंपरी -भोसरी गावात सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव सोमवारी (दि. 18) आणि मंगळवारी (दि. 19) होणार आहे. सोमवारी होणारी बैलगाडा शर्यत काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे उत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी 6 वाजता श्रीं ची पूजा, सायंकाळी साडेसात वाजता लोकनाट्य तमाशा, सायंकाळी साडेसात ते रात्री 10 पर्यंत श्रीं च्या पालखीची मिरवणूक आणि ढोल ताशांचे खेळ होणार आहे.
मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 12 लोकनाट्य तमाशाची हजेरी, सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत श्री भैरवनाथ मंदिर मध्ये चक्री भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा हे नियोजित कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती भोसरीतील श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.