वडगाव मावळ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात वडेश्वर केंद्राचे कार्यक्षम केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे यांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वडगांव मावळ येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना नेते शरद हुलावळे, भाजप प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते गणेशआप्पा ढोरे, मा. सभापती राजाराम शिंदे, मा. उपसभापती गणेश गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
रघुनाथ मोरमारे यांनी यापूर्वी मोरमारेवाडी, करंजगाव, खांडी व वडेश्वर येथे ज्ञानदान सेवा केली असून ते हस्ताक्षरनिपुण व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शिक्षक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांना पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिवसेनेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून आता आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कुंभार व गंगासेन वाघमारे यांनी केले तर संयोजन शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी केले.