पिंपरी – आणखी 135 बाधित

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 135 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 180 बाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरात 135 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 73 हजार 99 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एक बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4425 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 306 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 7667 जणांची तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयांमध्ये 387 व गृह विलगीकरणात 712 रुग्ण उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.