पिंपरी : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाअंतर्गत आत्तापर्यंत उभारलेले प्रकल्प, गृह रचना सोसायटी आणि उड्डाणपुले याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रफित उभारण्यात आली आहे. प्राधिकरण कार्यालयाच्या तळमजल्यात त्याचप्रमाणे आयुक्तांच्या कक्षाबाहेर असलेल्या प्रतिक्षालय कक्ष या दोन ठिकाणी उभारण्यात आली आहे. ती यंत्रणा सोमवारपासून सुरुवात झाली.
प्राधिकरण कार्यालयांतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे प्रकल्प उभारले आहेत.
त्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे. सेक्टर 12, 30-32 या ठिकाणाचे गृह प्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते, विकास कामे आणि मोशी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर त्याची माहिती या चित्रफीत अंतर्गत दाखवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळे नागरिक, ग्रामस्थ वेगवेगळ्या कामासाठी पीएमआरडीए कार्यालयात येत असतात. अनेकदा या कार्यालयाची नेमकी माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती पोहोचण्याचा हा उद्देश असल्याचे प्राधिकरणातील विद्युत विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यालयात आल्यानंतर तळमजल्यावर असलेल्या प्रतिशा गृहमध्ये अनेक नागरिक थांबलेले असतात. त्यामुळे त्यावेळी नागरिकांना माहिती व्हावी यासाठी येथे ही चित्रफत उभारली आहे. तर, आयुक्तांच्या कक्षा बाहेर देखील वेगवेगळ्या भागातून नागरिक येत असतात, त्यांना देखील माहितीसाठी येथे चित्रफित उभारली आहे.