पिंपरी : फार्मासिटीकल कंपनीत गुतवणूक करण्यास सांगून बावधान येथील एकाची 48 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १ ऑगस्ट २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ताथवडे येथे घडली.
याबाबत २८ वर्षीय व्यावसायिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन उमेश मुनोत (रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्मासिटीकल प्रोडक्ट, सर्जिकल प्रोडक्ट, फास्ट मुव्हींग कंज्युमर प्रोडक्ट असा 22 लाख रुपयांचा गोडाऊनमध्ये स्टॉक व कंपन्यांना दिलेल्या परचेस ऑर्डरचे २४ लाख व इतर एक लाख ९९ हजार असे एकूण ४७ लाख ९९ हजार रुपये फिर्यादीकडून आरोपीने गुंतवणूक म्हणून घेतले. मात्र आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी या रक्कमेत अपहार केला. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.