पिंपरी : दिवसभरात 230 जणांना करोनाची लागण

  • करोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ; दुसऱ्या लाटेची शक्‍यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये दिवाळीनंतर मोठी वाढ होऊ लागली आहे. तब्बल महिनाभरानंतर पहिल्यांदाच शहरात द्विशतकी रुग्णसंख्या आढळून आली असून, गेल्या 24 तासांत 230 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 90 हजार 696 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 215 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील 15 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कालपर्यंत शहरातील 1586 तर शहराबाहेरील 656 जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत शहरातील 87 हजार 275 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 6984 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 100 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1453 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3501 जण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.

दुसऱ्या लाटेची शक्‍यता
पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या आक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्य प्रमाणात घटली होती. शंभरच्या आतमध्ये अनेकदा बाधितांचा आकडा आणण्यामध्येही प्रशासनाला यश आले होते. मात्र दिवाळीनंतर आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज महिनाभरानंतर पहिल्यांदाच दोनशेहून अधिक बाधित आढळून आल्याने दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.