पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येताच धडक मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणाचे आरोग्य दूषित केल्याप्रकरणी आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आली. या कारवाईतून अकरा हजार रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने बुधवारी (दि.5) ही कारवाई केली.
शहरातील नागरिकांना स्वच्छ्तेची सवय व्हावी, याकरिता महापालिकेचा आरोग्य विभाग कायम जनजागृती मोहीम राबवत असतो. कचरामुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेच्या वतीने घरगुती कचर्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया केली जाते. तरीदेखील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा टाकत आहेत.
यामुळे शहराचे सौंदर्य तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा नागरिकांना कारवाई करण्याचा इशारा देऊन ही त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणि कचरा टाकला जात आहे. या गटनांना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.