मेट्रो पिंपरीतच सुसाट

पुणे -गेल्या दोन वर्षांत मेट्रो प्रकल्पाने गती पकडली असली, तरी पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रकल्पाचे काम 20 टक्के अधिक वेगाने सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मार्ग 2022 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, या वर्षी डिसेंबर 2019 अखेर यातील पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सुमारे 31 कि.मी.च्या या दोन मार्गांचे काम महामेट्रोने 2017 मध्ये प्रत्यक्षात सुरू केले. यात डिसेंबर 2019 पर्यंत वनाज ते गरवारे महाविद्यालय (5 कि.मी.) आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा 7 कि.मी.चा प्राधान्य मार्ग निश्‍चित केला आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी 2 स्थानके असतील. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून पुणे हद्दीतील प्राधान्यमार्गाचे काम अवघे 52 टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोने निश्‍चित केलेल्या वेळेत पुण्यातील मार्ग सुरू होणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील कामाचा वेग पाहता हे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात अडथळ्यांची शर्यंत
पिंपरी-चिंचवड हद्दीत काम वेगाने होण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे, तेथील रस्ते ठरले आहेत. जेथे काम सुरू आहे, तेथे आधीच बीआरटी तसेच इतर वाहनांसाठी प्रशस्त रस्ता आहे. त्यामुळे मेट्रो कामासाठी वाहतुकीत फारसे बदल करावे लागले नाहीत. पर्यायाने काम बंद ठेवण्याची वेळही आली नाही. या उलट पुणे हद्दीत पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तसेच या मार्गावर दुमजली उड्डाणपूल आहे. त्यामुळे वाहतुकीवर लक्ष ठेऊनच महामेट्रोला हे काम करावे लागत असल्याने पुण्यात महामेट्रोला अडथळे येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)