कामाच्या गतीमध्ये उद्योगनगरीतच “पुणे मेट्रो’ सुसाट
पिंपरी – प्रत्येक ठिकाणी पुणे मेट्रो असाच उल्लेख असलेल्या आणि नावात कुठेही पिंपरी-चिंचवडला स्थान न मिळालेल्या मेट्रोच्या कामात पिंपरी-चिंचवड शहराने पुण्यास खूपच मागे टाकले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सर्व मेट्रोच्या कामांची प्रगती पाहता सुमारे 31 टक्के काम पूर्ण झाले आहे, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास 45 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रो सर्वांत आधी पिंपरी-चिंचवड शहरातच धावणार आहे. या प्रायोरिटी रुटचे जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेट्रोच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मेट्रो मार्गिका-1 चे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे आणि संयुक्त महाव्यपस्थापक नितीन जोशी यांनी मेट्रोच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. अखेर खडकीत काम सुरू
मेट्रोचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसत होते, परंतु केवळ पिंपरी-चिंचवड शहरातच दिसत आहे.
दापोडीच्या पुढे संरक्षण विभागाची जमीन असल्याने हे काम थांबले होते. अखेर संरक्षण विभागाकडून ही जमीन मिळाली असून खडकी येथेही काम सुरू झाले आहे. आता या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. खडकीत काम सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात मात्र निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. त्या ठेकेदारावर कारवाई मेट्रो वेगाने काम करण्याच्या मूडमध्ये असताना स्थानकाचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून दिरंगाई होत होती. यावर तातडीने कारवाई करत मेट्रोने अल्फ्रा आणि एचसीसी या संयुक्त कंपन्यांकडून पाच स्थानकांचे काम काढून घेतले आहे. हे काम इतर ठेकेदारांना देण्यात येणार आहे. या कंपनीकडे अपेक्षित वेगाने काम करण्याची क्षमता नसल्याने दंडात्मक कारवाईच्या स्वरुपात ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात आले आहे.