“आयटीनगरी’चे “शट डाऊन’

दिघी, बोपखेलमध्ये कडकडीत बंद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

पिंपरी – मराठा क्रांती मोर्चाची धग आता पिंपरी-चिंचवड कामगारनगरीलाही जाणवू लागली आहे. शहरात टप्प्या-टप्प्याने बंद पाळला जात असून सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. सोमवारी (दि. 30) हिंजवडी, माण, मारुंजी, दिघी, बोपखेलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी हिंजवडीत सकाळी तब्बल तीन तास ठिय्या मांडला. तसेच परिसरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने “आयटीनगरी’चे “शट डाऊन’ झाल्याचे पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थेरगावातील डांगे चौक येथे जलसमाधी घेतलेले काकासाहेब देशमुख यांच्यासाठी श्रध्दांजली सभा घेण्यात आली. त्यावेळी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पहिला बंद पाळला होता. त्यानंतर सांगवीमध्ये बंद पाळण्यात आला. कालपासून आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, चिखली या भागामध्ये काल बंद पाळण्यात आला. मराठा सकल मोर्चाकडून हिंजवडीतील मेझ्झा नाईन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शिवाजी चौकात आल्यानंतर मोर्चाला ठिय्या आंदोलनाचे स्वरुप आले. हिंजवडीसह, वाकड, माण परिसरातील हजारो तरुण मोर्चात सहभागी झाले होते. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच राहील, मराठा समाजाचा संयम सुटत चांगला आहे याची गांभिर्याने दखल घ्यावी, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)