बदललेल्या जीवनशैली आणि आहारामुळे मूळव्याधाची समस्या घरोघरी भेडसावत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा. पाईल्ससह फिशर आणि भगंदराचे आजार सार्वत्रिकपणे दिसून येतात.
मूळव्याधीचे दोन प्रकार असतात. विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) आणि रक्तस्त्रावासहित (रक्तमूळव्याध). गुदद्वाराच्या सभोवताली आतील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या बाहेर आल्यामुळे तेथे सातत्याने तीव्र वेदना होतात व काटा टोचल्यासारखे वाटते.
परिकर्तिका (फिशर) यामध्ये गुदभागी भेगा पडतात व त्यामुळे तीव्र वेदना होतात. तीव्र वेदनांसह आग होणे आणि मलाबरोबर रक्त बाहेर पडते. तर भगंदरामध्ये (फिस्टुला) गुदाच्या जवळ जखम होते. बाहेरून बरी झाली तरी ही जखम गुदाच्या आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून वारंवार रक्त किंवापू येण्याच्या रुग्णाच्या तक्रारी असतात.
पारंपरिक उपचार पद्धतीनुसार होणाऱ्या शस्त्रक्रिया अतिशय वेदनादायी असत आणि त्यानंतर रुग्णाला बरे होण्यास खूप वेळ लागत असत. परंतु सध्याच्या वेगवान आयुष्यात कामाच्या ताणामुळे कमी वेळेत बरे करणाऱ्या उपचारांकडे रुग्णांचा कल दिसून येतो. अशा जलद उपचारांमध्ये अग्रगण्य असलेल्या लेसर तंत्राच्या उपचाराचा समावेश होतो. लेसर हेमरॉईडप्लास्टी (एलएचपी) ही हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये अवलंबली जाणारी अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती वेदनारहित असून कमीतकमी छेद घेऊन काही तासांतच रुग्णाला आराम मिळवून देणारी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.
मलविसर्जनाच्या वेळेस रक्तस्त्राव झाल्यामुळे लोक घाबरून जातात. मलमार्गात (रेक्टल) होणाऱ्या रक्तस्त्रावावर उपचार उपलब्ध आहेत. एलएचपी उपचार तंत्र हे मोडाच्या मूळव्याधासाठी आणि भगंदरावरील उपचारासाठी फिलेसी (फिस्टुला ट्रॅक्ट लेसर क्लोजर) उपचार तंत्र उपलब्ध आहे. मूळव्याधाच्या प्राथमिक टप्प्यात जेव्हा रुग्णांना मलविसर्जनाच्या वेळी होणारा रक्तस्त्राव आणि वेदना रोखता येत नाहीत तेव्हा हे दोन्ही उपचार तंत्र प्रभावी ठरतात.
त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेतः
१) शस्त्रक्रियेदरम्यान छेद घेतला जात नाही त्यामुळे टाके घालण्याची गरज नाही
२) शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास कमीतकमी, लवकर बरे होण्यास मदत
३) शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्ण घरी जातो व एक-दोन दिवसात कामावर रुजू होऊ शकतो.
४) शस्त्रक्रियेदरम्यान चिमट्यासारख्या बाह्य वस्तूंचा वापर नाही
५) संबंधित भागापुरती भूल देऊन किंवा कमी वेळ भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते