नदीपात्रातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू

पुणे – मागील दोन आठवड्यांपासून नदीपात्रात बंद असलेले महामेट्रोचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नदीपात्रात चिखल झाल्याने तेथे अवजड वाहने जात नसल्याने महामेट्रोकडून या ठिकाणी खांबाच्या पाया खोदाईनंतर काढून बाजूला ठेवलेला मुरूम रस्त्यावर टाकून वाहनांसाठी रस्ता करून देत हे काम सुरू करण्यात आले आहे.

महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गातील सुमारे 1.7 किलोमीटरचा मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते महापालिका भवनापर्यंत नदीपात्रातून जातो. तेथे महामेट्रोचे सुमारे 59 खांब आहेत. त्यात 24 खांब असून इतर पाइल फाऊंडेशन आहेत. त्यातील जवळपास 80 टक्के खांबाच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून अनेक खांबांचे बांधकाम जमिनीच्या वरपर्यंत आले आहे. त्यातच खडकवासला, पानशेत धरणही भरल्याने मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे महामेट्रोकडून हे नदीपात्रातील काम अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून नदीत पुन्हा पाणी सोडण्यात येत असले, तरी या पाण्यामुळे पात्राच्या बाजूला काम करण्यात अडचणी नसल्याने महामेट्रोकडून नदीपात्रात पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)