मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यापासून सुरू झालेली आरोपप्रत्यारोपांचं रुपांतर आता राजकीय जुगलबंदीत झाल्याचं पाहिला मिळत आहे. या जुगलबंदीत आता डुकराची एन्ट्री झाली असून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डुक्कराचा उल्लेख असणारं ट्विट करून नाव न घेता नवाब मलिकांवर निशाणा साधला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना फडणवीसांनी उच्च पदांवर बसवले असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. तसेच बनावट नोटांचं रॅकेट फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू होतं, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र भाजप आक्रमक झालं आहे.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
या आऱोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी ‘Thought of the day’ या कॅप्शनसह एक ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर सुविचार शेअर केला आहे. हा सुविचार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा आहे. ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं’, असं फडणवीस ट्विटमध्ये म्हटले.
मागील काही वर्षांत देवेंद्र फडणवीसांवर अशा प्रकराचे आरोप कोणत्याही नेत्याने केले नाहीत. मात्र नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केलेले आरोप आणि पाकिस्तान कनेक्शन गंभीर आहेत. यावरून आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.