पुणे : यंदा पिफमध्ये ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम असून त्यानिमित्ताने गेल्या ६० वर्षातील मराठीतील गाजलेल्या चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे भरविण्यात आले आहे.
या निमित्ताने गेल्या साठ वर्षांतील मराठी चित्रपटांचा प्रवास पाहण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना मिळाली आहे. या व्हिडिओतून खास डिजिटल प्रभातच्या वाचकांसाठी या प्रदर्शनाची एक सफर घेऊयात.