‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री व प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिचा मराठमोळा लूक व्हायरल झाला आहे.
सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत.
यात तिने नव्वारी साडी नेसली आहे. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून नेटकऱ्यांनी तिची खूप तारिफ केली आहे. सईने शेअऱ केलेल्या फोटोत तिच्या आईसोबतचा देखील एक फोटो आहे.
दबंग 3 मधील अनुभवाबाबत सई म्हणते, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सलमानसोबत पहिला सिनेमा करणं म्हणजे माझ्यासाठी स्वप्नच सत्यात उतरल्यासारखं होतं.
सलमान खान, सोनाक्षी सिन्हा अशा बड्या कलाकारांसोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एकूणच हा माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर अनुभव होता.”