#photoviral : दीपवीर कुटूंबासह पोहचले अमृतसरला 

मुंबई – बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणार हॉट कपल म्हणजेच दीप-वीर अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2018 ला हे कपल लग्नबंधनात अडकले होते.

नुकताच दीपवीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पार पडला आहे. या खास दिवसा निमित्त दीपवीर कुटूंबासह अमृतसर येथील गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेतले.

दीपीकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते. यावेळी दीपिकाने महरूम रंगाचे आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केला होता, तर जांभळी रंगाच्या शेरवानीमध्ये रणवीर देखील सुंदर दिसत होता.


यावेळी दोघांचाही अंदाज पाहण्यासारखा होता. तत्पूर्वी दीपवीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस दिवसानिमित्त यापूर्वी आंध्रप्रेदशातील तिरूपती मंदिरात आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.