पुणे : शहरात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, काही ठिकाणी लोक पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहात शहरातील अनेक भागात शेकडो वाहने वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळत आहे.