बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर आणि तालुक्यात सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बारामातीकरांची त्रेधा उडाली. शहरातील भिगवण रस्त्यावर झाडे पडली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
काही इमारतींच्या काचा फुटल्या. तर अचानक सुरू झालेल्या या अवकाळीने फळ बागायतदारांची चिंता देखील वाढवली.
शहर व तालुक्यात दिवसभर ऊनाचा पारा वाढला होता . सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. त्यानंतर सोसाट्याच्या वारा सुरू झाला प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. त्यापाठोपाठ विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले . शहरातील नेवसे रोड येथील यशवंतराव चव्हाण उद्योग भवनाच्या काचा फुटल्या. तसेच रस्त्यावर झाडे पडली. कारणावरून सुरक्षिततेच्या कारणावरून काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.