पुणे – गणेशोत्सव आणि त्यातील देखावे हे समीकरण वर्षानुवर्षे चालत आहे. प्रबोधन आणि मनोरंजन हे मुख्य दोन हेतू त्यामागे आहेत. बदलत्या काळात या देखाव्यांनी आपले रूप बदलले असले, तरी त्याची लोकप्रियतादेखील तितकीच वाढली आहे.
यंदाही शहरातील विविध मंडळांनी आकर्षक आणि भव्य देखावे सादर केले आहेत. तर, काहींनी नाट्यरूपी संवाद सादरीकरणावर भर दिला आहे. यात प्रामुख्याने ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावेदेखील लोकप्रिय ठरत आहेत. त्यातील काही देखाव्यांची छायाचित्रे खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…
पुणे स्टेशन येथील नीलकंठेश्वर मित्र मंडळाने आकर्षक महल उभारला आहे.
शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत जगदंबेच्या साडेतीन शक्तीपीठांच्या रथावर श्रींची मूर्ती विराजमान केली आहे.
मनपा येथील मुंजोबा तरुण मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई साकारली आहे.
भवानी पेठ येथील जय भारत मंडळाने यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा भव्य देखावा साकारला आहे. तो पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाने यंदा “गंधगणेश रथ’ साकारला असून त्यात श्रींची विलोभनीय मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने यंदा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “निळ्या आकाशातील लाल तारा-अण्णा भाऊ साठे’ हा हलता देखावा साकारला आहे.
अरण्येश्वर मित्रमंडळ यंदा 60व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यंदा मंडळाने गणेशोत्सवात “मातृदेवो भवः पितृदेवो भवः सर्वदेवो भवः’ हा भावस्पर्शी देखावा सादर केला आहे.
ग्राहक पेठेच्या वतीने यंदा तब्बल 20 हजार बिस्कीटे आणि चॉकलेट्सचा वापर करुन बिस्कीटांचे गणेश मंदिर साकारण्यात आले आहे.
भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधव याने शुक्रवारी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी, केदार याच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तो म्हणाला, “भारतीय संघाला मिळालेल्या यशाबद्दल बाप्पाचे धन्यवाद मानतो. दरवर्षी आपण बाप्पाकडे काही तरी मागत असतो, परंतु, या वर्षी गणरायाने खूप भरभरून दिले आहे, यापुढेही देईल अशी आशा व्यक्त करतो.’
जय महाराष्ट्र तरुण मंडळाने “हनुमानाचे विराट रुप’ हा हलता देखावा साकारला आहे.
खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “श्रीकृष्णाची रासलीला’ हा हलता देखावा साकारला आहे.
रास्तापेठ जवाहर मंडळाने “कैकानी राक्षसिणीचा वध’ हा हलता देखावा सादर केला आहे.
ढोले रस्ता येथील तरुण विकास मंडळाची आकर्षक महलातील श्रींची मूर्ती
कसबा पेठेतील जनता जनार्दन मंडळाने कापडी पडद्यांचा वापर करुन आकर्षक गणेश महाल साकारला
दरवर्षी आपण बाप्पाकडे काही तरी मागत असतो, परंतु, या वर्षी गणरायाने खूप भरभरून दिले आहे, यापुढेही देईल अशी आशा व्यक्त करतो.’