मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.
View this post on Instagram
सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
View this post on Instagram
नुकतंच सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतले काही मादक फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. याच बरोबर तिने गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. सध्या सोशलवर सायलीचा हा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. सायली मूळची नाशिक शहरातील आहे. दरम्यान कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहत आहे. सायली नुकतीच झिम्मा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.