मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘विद्या बालन’ ही तिच्या साडी लुक मुळे सतत चर्चेत असते. पण तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते. सोशल मीडियावर सुद्धा तिच्या साडी लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. इंस्टाग्रामवर विद्या बालनाचा मोठा चाहता वर्ग असून, तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
विद्याने वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल ‘हम पांच’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय तिने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.
View this post on Instagram
नुकतंच विद्या बालन आणि शेफाली शाह त्यांच्या आगामी ‘जलसा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जुहूमध्ये आल्या होत्या. यावेळी विद्याचा हटके लूक पहायला मिळाला. विद्याने ग्रीन कलरच्या झेब्रा लूकमधली साडी नेसली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.
View this post on Instagram
तर, दुसरीकडे शेफालीने अबोली कलरचा वनपीस घातला होता आणि त्याला साजेसं पांढऱ्या रंगाचं जॅकेटही तिने घातलं होतं. यावेळी या दोघींचा ग्लॅमर्स लूक दिसून आला. ग्रीन कलरच्या झेब्रा साडीमधील विद्या बालनचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने विद्याचे नशीबच बदलून टाकले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री विद्या बालनने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे.