मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सामान्य नागरिकांसोबतच, अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, या सोहळ्यात हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्ज कलाकारांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे.