#फोटो गॅलरी : फिल्मफेअर मधील बॉलिवूड सेलेब्सचा जलवा पाहिलात का?

मुंबई – बॉलिवूडची दुनिया मुंबईत मंगळवारी (दि. ३) रात्री फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोचे आयोजन करण्यात आले असून, अवॉर्ड शोचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. त्यामुळे या दिमाखदार सोहळ्यासाठी बॉलिवूड आणि टीव्ही मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांचा रेड कार्पेटवर अनोखा जलवा बघायला मिळाला.

दरम्यान, यावेळी बॉलीवुड स्टार आपल्या हटके फैशनेबल स्टाईलमध्ये दिसून आले. या अवॉर्ड शोमधील बॉलिवूड सेलेब्सचे काही ग्लैमर आणि स्टनिंग फोटोज सोशल मीडियावर वायरल होत आहे.

या अवॉर्ड समारोहात आलिया भट्टला सर्वात स्टाइलिश फीमेल तर अनुष्का शर्माला सर्वात ग्लैमरस फीमेल स्टार अवॉर्ड मिळाला. तर सर्वात स्टाइलिश  मेल आयुष्मान खुराणा तर सर्वात ग्लैमरस मेल वरून धवन स्टार अवॉर्ड मिळाला.

यादरम्यान, सनीची एन्ट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा स्टनिंग लूक अतिशय आकर्षक होता. यावेळी सनी ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली.

Leave A Reply

Your email address will not be published.