बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. यामीच्या लुक्सची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. तिचे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांनी तिला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
त्यात इंडोवेस्टर्न लुक यामीवर फारच खुलून दिसत आहे. लाल बांगड्या, तर कानात पारंपरिक पहाडी कानातले या लुकमध्ये यामी फारच सुंदर दिसत आहे. फ्लोरल लेहंग्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक आदित्य धारसोबत काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली यामी अजूनही तिचे लग्नातील पारंपरिक कानातले परिधान करत आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर असंख्य चाहत्यांनी कमेंट्स देत यामीच्या सौंदर्याचे तोंड भरून कौतूक करत आहे.
View this post on Instagram
तसेच बॉलीवूडमधील स्टार कलाकारांनीही यामीच्या फोटोला रिपोस्ट केले आहे. वर्कफेंटबाबत सांगायचे झाल्यास यामी लवकरच “भूत पोलीस’ चित्रपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये यामी सध्या व्यस्त दिसत आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिसने स्क्रीन शेअर केली आहे.