मुंबई – मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडणार अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यामुळेच सिद्धार्थ सोशल माध्यमांच्या लाइमलाईट असतो.
View this post on Instagram
सिद्धार्थ नेहमीच इंस्टाग्रामवर हटके लूक मधील आपले काही फोटो शेअर करत असतो. त्याचे फॅन्स देखील सिद्धार्थच्या या फोटोंना भरभरून लाईक्स देतात. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
या फोटो मध्ये सिद्धार्थ जाधवने पिवळ्या रंगाचा सूट घातला असून, त्यावर एक हॅट घातली आहे. सिद्धार्थचा हा लूक 1994 च्या जिम कॅरी अभिनीत “द मास्क’ चित्रपटातील असून, हा चित्रपट हॉरर फिल्मच्या शैलीमध्ये मोडला जातो. या लूक मध्ये सिद्धार्थ हुबेहूब ‘द मास्क’ चित्रपटातील जिम कॅरी यांच्या सारखा दिसत आहे.
View this post on Instagram
कॉलेज जीवनापासून सिद्धार्थला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थने अनेक एकांकिका गाजवल्या. बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का, हुप्पा हुय्या या चित्रपटात सिद्धार्थ हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. तर गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकला होता.
View this post on Instagram
मराठी सिनेसृष्टीतील एक मोठा कलाकार म्हणून सिद्धार्थकडे आज पाहिले जाते. तरीही सिद्धार्थ जाधव हा “आपणही मध्यमवर्गीय कुटंबातून पुढे आलेलो आहोत… ‘ याची नेहमी सर्वांना आठवण करून देत असतो.