पीएचएम टायगर्स, बिस्मार्ट, रॉयल्स, सीए स्पार्टन्सची आगेकूच

पुणे : आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेतर्फे आयोजित सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत पीएचएम टायगर्स, बिस्मार्ट, रॉयल्स, सीए स्पार्टन्स, आयसीएएन, एसबीएच स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत अभिषेक खांबेटे नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीएचएम टायगर्स संघाने सीए चॅम्प्स संघाचा 11 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. पहिल्यांदा खेळताना पीएचएम टायगर्सने 8 षटकात 1 बाद 96 धावा केल्या. यात अभिषेक खांबेटेने नाबाद 52, तर रूद्रांगने 38 धावा करून संघाचा डाव भक्कम केला.

96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शाल्वा कर्वेच्या अचूक गोलंदाजीने सीए चॅम्प्स संघाचा डाव 8 षटकात 8 बाद 85 धावांत रोखला.
दुसऱ्या लढतीत वंदीत सबलोकच्या दमदार 41 धावांच्या बळावर आयसीएएन संघाने इवाय वॉरियर्स संघाचा 41 धावांनी दणदणीत पराभव करत आगेकूच केली.

पहिल्यांदा खेळताना वंदीत सबलोकच्या 41 व हरप्रीत सरनच्या 46 धावांसह आयसीएएन संघाने 8 षटकात 3 बाद 106 धावांचा डोंगर रचला.
निर्धारित आव्हानाचा पाठलाग करताना इवाय वॉरियर्स संघ 8 षटकात 6 बाद 65 धावांत गारद झाला.

अन्य लढतीत किशन जैनच्या अषटपैलू खेळीच्या जोरावर बिस्मार्ट संघाने प्रास इलेव्हन संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. तर एसबीएच स्मॅशर्स संघाने सी अँड एल स्ट्रायकर्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. सीए स्पार्टन्स संघाने सीए सुपरकिंग्ज संघाचा 3 धावांनी, तर रॉयल्स संघाने सीए चॅम्प्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.