मनाली – मागील काही काळापासून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीनची हेकेखोरी वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आता या प्रदेशातील अनेक देशांनी चीनच्या दाबवतंत्रासमोर न झुकता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे.
फिलिपाइन्सने पुन्हा चीनला इशारा दिला आहे. चीनने आमच्या नौसेनेच्या जहाजांवर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेची मदत घेऊन, असे फिलिपाइन्सने म्हटले आहे.
फिलिपाइन्सचे परराष्ट्र मंत्री टओडोरो लोकसीन म्हणाले, चीनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेबरोबर केलेल्या सुरक्षा करारानुसार त्यांची मदत घेऊ. दक्षिण चीनच्या समुद्रातील सीमेवरुन सुरु असणाऱ्या वादातूनच मनीलामधून बीजिंगला हा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
परराष्ट्र मंत्री लोकसिन यांनी आमच्या वायुसेनेची विमाने या पुढेही दक्षिण चीनच्या समुद्रावर नजर ठेवतील. या भागावर त्यांच्या संचाराला कोणीही प्रतिबंध घालू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. फिलिपाइन्सने दिलेला हा इशारा म्हणजेच उगाच आम्हाला प्रवृत्त करण्याचा प्रकार असल्याचे चीनने म्हटले आहे.