‘मरणाच्या दारात असतानाही दाखवली परोपकारी वृत्ती’; 60 वर्षांच्या महिलेने तरुणासाठी सोडला बेड

नवी दिल्ली -देशात करोना महामारीने धुमाकूळ घातला आहे.  कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. मात्र अशा कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे. प्राणवायूची गरज असलेला दुसरा कुणी आल्यास त्याला आपल्या वाट्याचा प्राणवायू देण्याचे दातृत्व आजवर कुणी दाखविले नसेल. मात्र आता अशा घटना घडत असून एक आगळा आदर्श निर्माण होत आहे.

माणसाचे वय कितीही झाले, तरी जगण्याचा मोह कुणाला सुटत नाही. त्यातही एखादी व्यक्ती बेडवर मास्क लावून एकेका श्वासासाठी संघर्ष करीत असताना प्राणवायूची गरज असलेला दुसरा कुणी आल्यास त्याला आपल्या वाट्याचा प्राणवायू देण्याचे दातृत्व दाखविले आहे, राजस्थानमधल्या एका तरुणाला बेड मिळावा, यासाठी एका वृद्ध महिलेने तिचा बेड सोडल्याची घटना घडली. ही महिला स्वत: ऑक्सिजनद्वारे श्वास घेत आहे. मात्र तो तरुण कोरोनाग्रस्त असून त्याची तब्येत फार जास्त आहे. विशेष म्हणजे ती महिला व्हेलचेअरवर बसून बेड मिळण्याची वाट पाहात आहे. तर त्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील  60 वर्षीय लेहर कंवर या महिलेला काही दिवसांपूर्वी  कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी बेड अभावी त्यांना तब्ब्ल चार तास ओपीडीच्या व्हिलचेअरवर थांबल्यानंतर लेहर यांना बेड मिळाला. मात्र बेड मिळाल्यानंतर  त्यांची नजर एका तरुणाकडे गेले. 40 वर्षीय बाबूराम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते गंभीर अवस्थेत असून त्यांचा जीवन-मृत्यूशी लढा सुरु होतो. बाबूराव यांना गंभीर अवस्थेत बघून लेहर यांना पाझर फुटला. त्यांनी डॉक्टरांना संपर्क साधत स्वत:चा बेड त्यांना द्या, असे सांगितले.

‘माझे  झाले आहे. मी भरपूर आयुष्य जगले. पण, या तरुण रुग्णाच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे मला बेड न देता माझा बेड या रुग्णाला द्या.’ असा आग्रह त्यांनी धरला. मी अजून काही काळ व्हिलचेअरवर थांबू शकते.’ असेही लेहर म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.