नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुक 2019 पार पडत आहेत. आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये 374 मतदारसंघांत मतदान पार पडले असून आज लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशात सरासरी 60.80 टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये 56.79 टक्के, जम्मू काश्मीर 17.07 टक्के, मध्य प्रदेश 62.96 टक्के, राजस्थान 63.03 टक्के, उत्तर प्रदेश 53.32 टक्के, पश्चिम बंगाल 74.06 टक्के तर झारखंड येथे 63.99 टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इरणी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, जतिन प्रसाद आणि सपा नेत्या पूनम सिन्हा या नेत्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंदिस्त होणार आहे.