पुणे – फार्मसी शिक्षणातील डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय कौन्सिल ऑफ फार्मसीने घेतला आहे. त्याची अधिसूचना दि. 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली.
फार्मसी पदविका अभ्यासक्रम 30 वर्षांनी बदलल्यात आला आहे. यात कौशल्ये, ज्ञान, रोजगारभिमुकता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कौन्सिल ऑफ फार्मसीकडे पुण्यातील शिक्षणसंस्थांनी फार्मसी पदविका अभ्यासक्रम बदलण्याची मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
अखेर अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पुण्यातील फार्मसी महाविद्यालयांनी स्वागत केले आहे. यामुळे फार्मसी क्षेत्राला नवीन दिशा मिळणार असल्याचे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्यांनी म्हटले आहे.