ज्ञानेश्‍वर माऊलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज

फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा आषाढीवारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना सातारा जिल्ह्यात 4 दिवस वास्तव्यास असून त्यापैकी 3 दिवस फलटण तालुक्‍यात माऊलींचे वास्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर माऊलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज झाली आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत माऊलींच्या पालखीचे फलटण शहरात आगमन होणार आहे. ‘माउली… माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली आहे. दरम्यान, फलटणच्या विमानतळावर विसावा घेऊन पालखी उद्या बरडकडे मार्गस्थ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.