फलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात

फलटण  (प्रतिनिधी) : फलटण उपविभागीय पोलिस कार्यालयातील डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांचे लाच प्रकरणात नाव समोर येत आहे. बुधवारी दुपारी याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांची टीम फलटणमध्ये दाखल झाली असून ते याप्रकरणी चौकशी करत आहेत.

पाटील यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले असून मुख्यमंत्री जिल्ह्यात असताना पोलिस उपअधीक्षक सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची व्याप्ती वाढल्याने सातारा एसीबी पथकाला फलटण येथे जावे लागले. रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबी पोलिस अधिकारी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.