PF Money Withdraw: देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि कागदपत्रांची जुळवाजुळव लवकरच बंद होणार आहेत. केंद्र सरकार पीएफ खात्याला थेट बँकिंग गेटवेशी जोडत असून, यामुळे युजर्सना आपल्या पीएफ खात्यातून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहेत. केंद्र सरकार ‘ईपीएफओ 3.0’ या मोहिमेअंतर्गत पीएफ खात्यांचे आधुनिकीकरण करत आहे. पीएफ खाते आता तुमच्या सामान्य बँक खात्यासारखे काम करणार आहे. बँकिंग गेटवेला जोडल्यामुळे ते पूर्णपणे डिजिटल होईल. ज्याप्रमाणे आपण बँकेतून पैसे काढतो, त्याचप्रमाणे एटीएम कार्ड वापरून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून (UPI) पीएफमधील रक्कम काढता येईल. या निर्णयामुळे पीएफ कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही. पंतप्रधान मोदी करणार शुभारंभ PF Money Withdraw: समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या क्रांतिकारी सुविधेचा शुभारंभ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर, गरजेच्या वेळी पीएफमधून पैसे काढण्यासाठी लागणारा दिवसांचा कालावधी आता काही सेकंदांवर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व व्यवहार डिजिटल असल्याने त्यात अधिक पारदर्शकता येईल. सामान्य माणसालाही पीएफचा व्यवहार करणे सहज शक्य होईल. PF Money Withdraw: हेही वाचा : EPFO New Updates: झटपट पटापट करा विड्रॉ UPI अन् पेन्शन ; सरकार लवकरच लॉन्च करणार EPFO 3.0 काय असेल परिणाम? हा निर्णय ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेतील मैलाचा दगड मानला जात आहे. यामुळे पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, पीएफ हा निवृत्तीनंतरचा आधार असल्याने, एटीएमची सुविधा मिळाल्यावर लोक गरज नसतानाही पैसे काढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम दीर्घकालीन बचतीवर होऊ शकतो. सध्या पीएफ बॅलन्स कसा तपासायचा? PF Money Withdraw: नवीन प्रणाली पूर्णपणे लागू होण्यापूर्वी, तुम्ही सध्याच्या पद्धतींनी तुमचा बॅलन्स तपासू शकता. SMS द्वारे 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN ENG’ अशा फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवा (शेवटची तीन अक्षरे भाषेनुसार बदलू शकतात). मिस कॉलद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर कॉल करा. कॉल आपोआप कट होईल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला शिल्लक रकमेची माहिती मिळेल. हेही वाचा : EPFO 3.0 : पीएफ खातेदारांसाठी महत्वाची बातमी! लवकरच ‘हे’ 10 नवे नियम लागू होणार