“पीएफ’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आकुर्डी कार्यालयासमोर निदर्शने ः प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

पिंपरी – कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आकुर्डी येथील कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. ईपीएफओ संघटनेने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यात आकुर्डी येथील कर्मचाऱ्यांनी निदर्शने करीत सहभाग नोंदविला.

अधिकारी,आयुक्‍तांच्या भरतीऐवजी वर्ग ब, क, आणि ड वर्गातील कर्मचारी भरती करावी, प्रमाणित कार्यभारापेक्षा 2 ते 3 पट काम कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. त्यामुळे सेवेवर परिणाम होत आहे. अनेक वर्षे पाठपुरावा करुनही आंतर विभागीय बदलीवर व्यवस्थापनाने मार्ग काढलेला नाही, हा प्रश्‍न सोडवावा, अनेक कर्मचाऱ्यांना 15-15 वर्षांपासून सेवा ज्येष्ठतेचे लाभ देण्यात आलेले नाहीत, अशी मागणी आकुर्डी कार्यालयाचे सचिव अशोक गेंगजे यांनी केली. गेंगजे यांनी वर्ग ब, क, ड कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधले.

आकुर्डी कार्यालयाची असलेली दुरवस्था, कार्यालयातील तोकड्या सुविधा, त्यामुळे होणारी अस्वच्छता, धुळीचे साम्राज्य यावरही त्यांनी बोट ठेवले. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी, कामासाठी, रेकॉर्डसाठी जागा उपलब्ध नाही. नियमित व कंत्राटी असे सुमारे 200 कर्मचारी कार्यालयात काम करतात. परंतु, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची चांगली सोय उपलब्ध नाहीत, या सुविधा देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही गेंगजे यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.