टेलिरियन कंपनीत पेट्रोनेटची 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक

सामंजस्य करारानुसार 40 वर्षात 5 दशलक्ष टन एलएनजी आयात होणार

ह्युस्टन: भारतातील सर्वात मोठा एलएनजी आयातदार पेट्रोनेट वर्षाकाठी 5 दशलक्ष टन गॅसच्या खरेदीसाठी अमेरिकेतील प्रमुख कंपनी टेलोरियनच्या ड्राफ्टवुड प्रकल्पात सुमारे 20 टक्के भागभांडवलासाठी 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात ह्यूस्टनस्थित टेलोरियन आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडमध्ये शनिवारी एक सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराअंतर्गत भारतीय कंपनी पेट्रोनेट आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या 40 वर्षांच्या कालावधीत अमेरिकेतून 5 दशलक्ष टन एलएनजी आयात करतील. एलएनजीसाठी लुईझियानामध्ये 28 अब्ज डॉलरच्या ड्रिफ्टवुड प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याचाही या करारामध्ये समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
एलएनजीशी संबंधित अमेरिकेमध्ये भारतीय कंपनीचा हा सर्वात मोठा पेट्रोनेट व्यवहार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे अमेरिका-आधारित तेल कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्यासमवेत बैठक घेतली. “हाऊडी मोदी’ कार्यक्रमापूर्वी मोदींच्या पुढाकाराने हा उर्जा विषयक करार झाला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×