पेट्रोल विक्री पूर्वपदावर!

नवी दिल्ली -मार्च महिन्यानंतर देशातील इंधन विक्री कमी झाली होती. आता परिस्थिती पूर्ववत होत असून सध्या पेट्रोल विक्री पूर्वपदावर आली आहे. मात्र डिझेल विक्री अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. 

25 मार्चनंतर पेट्रोल विक्री प्रथमच फेब्रुवारी महिन्याइतकी वाढली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अजून वाहतूक सुरळीत झाली नसल्यामुळे डिझेल विक्री पूर्वपदावर आलेली नाही. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार विमानाची इंधन विक्री 60 टक्‍क्‍यांनी कमी आहे. 

स्वयंपाकाच्या गॅसची विक्री 12 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. गेल्याच आठवड्यात ऑगस्ट महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर झाली असून या महिन्यात कार विक्री 14 टक्‍क्‍यांनी तर दुचाकी विक्री 3 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.