#Petrol Rate Today: एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे इंधनाचे दर; जाणून घ्या आजचा भाव…

मुंबई – सध्या देशासह अनेक राज्यांत करोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढत आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू झाल्यामुळे इंधन मागणीवर मोठा परिणाम होत आहे. अश्यातच पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सलग १२ दिवशी देखील इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

आज (दि. ११) रविवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. तर दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे. 

गेल्या महिन्याभरापूर्वी पेट्रोल आणि डिझेल मध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता चांगलीच हैराण झाली होती. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने तर शंभरी पार केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.