पुणे – आधीच करोना आणि लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले असून, आता लोकांना आर्थिक चणचण सुद्धा जाणवू लागली आहे. आणि अश्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी (दि. 12) डिझेलच्या दारात काही पैशांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्यात पेट्रोलचे भाव वाढले असून, साधे पेट्रोल 98 रुपये 6 पैसे, तर पॉवर पेट्रोल 101 रुपये 74 पैसे लिटर झाले आहे. आणि डिझेल 88 रुपये 8 पैसे लिटर आहे. सततच्या इंधन दरवाढी मुळे सामान्य लोकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.