नवी दिल्ली – इंधनाच्या दरातील दैनंदिन वाढ सुरूच असून आज सलग आठव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा दर 62 पैशांनी तर डिझेलचा दर 64 पैशांनी वाढला. ही वाढ लक्षात घेता गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 4 रूपये 52 पैशांनी तर डिझेलचे दर 4 रूपये 64 पैशांनी वाढले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांचे दर कोसळत असताना मधल्या काळात सरकारने इंधनाच्या किंमती गोठवल्या होत्या. पण आता हे दर वाढू लागल्यानंतर सरकारने या किंमती आता नेहमीसारख्या दैनंदिन स्वरूपात जाहीर करण्याचे धोरण अवलंबले आहे.