पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी महागले असून प्रति लिटर ७८.७३ रूपये झाले आहे तर डिझेलच्या दरातही वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे मुंबईत डिझेलचा आजचा दर प्रति लिटर ६९.५३ रूपये आहे. राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

दरमयान, सौदी अरेबियामधून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानेल हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर १४, २५ आणि २९ पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर १५, २४ आणि १९ रूपयांनी महागलं होते.

इंडियन ऑयलने त्यांच्या संकेतस्थळार दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दर वधारून प्रति लिटर ७३.०६ रुपये, ७५.७७ रुपये, ७८.७३ रुपये आणि ७५.९३ रुपये झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.