नवी दिल्ली -: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटचे भाजपकडून कौतुक करण्यात येत आहे. सामान्यांवर अर्थव्यवस्थेचा भार टाकला नाही, असं सांगण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी पेट्रोल आणि डिजेलचे दर सतत वाढत आहे. यावरून विरोधक टीका करत असताना भाजपच्या खासदारानेच पेट्रोल दरवाढीवरून भाजपला घरचा आहेर दिला आहे.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 2, 2021
राम राज्यात अर्थात मोदींच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर असे म्हणत, भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. इंधन दरवाढीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अनोख्या शैलीमध्ये हे ट्विट केले आहे. भावनिक मुद्दा पुढे करत आपल्याच सरकारला हा टोला लगावला आहे. रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये 53 लिटर दर आणि रावनाच्या लंकेमध्ये पेट्रोलचे दर 51 रुपये लिटर असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
सरकारच्या चुकीच्या धोरणावर वेळेवेळी टीका करणारे नेते म्हणून सुब्रमण्यमस्वामी ओळखले जातात. त्यांच्या धोरणामुळे भाजप पक्ष अडचणीत येतो. मात्र स्वामी कधीही टीका करताना हयगय करत नाहीत.